Khandala : देवदर्शनासाठी जाणा-या कारचा अपघात; पिंपरी-चिंचवड मधील दोन डॉक्टरांचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  देवदर्शनासाठी जाणा-या कारचा अपघात झाला. या अपघातात पिंपरी-चिंचवड मधील दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला. तर तीन डॉक्टर गंभीर आहेत. हा अपघात पारगाव खंडाळा (जि. सातारा) येथे आज पहाटे झाला.

युवराज विलास घाटोळे (वय 40, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी. मूळ रा. मंगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. अन्य अपघातग्रस्त डॉक्टरांची नावे समजू शकली नाहीत.

युवराज घाटोळे शनिवारी रात्री काम आटपून आपल्या चार डॉक्टर मित्रांसह कारने गणपतीपुळ्याला जाण्यासाठी निघाले होते. पारगाव खंडाळा येथे आज पहाटे एकच्या सुमारास त्यांच्या कारचा टायर फुटला. त्यामध्ये समोरील बाजूला बसलेल्या युवराज घाटोळे यांच्यासह आणखी एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला.

डॉ.युवराज घाटोळे हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या चुलत्यांसोबत काळावेडी येथील ड्राव्हर कॉलनी येथे रहात होते. त्यांचे डांगे चौक येथे स्वतःचे रुग्णालय होते. युवराज यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते परिसरात मन मिळाऊ व अगदी रात्री अपरात्री सुद्धा धावून येणारे डॉक्‍टर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. त्यातील खुशी व ओजस ही दोन मुले त्यांच्या पहिल्या पत्नीचे मुले असून पहिल्या पत्नीचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी दोन वर्षापूर्वी विवाह केला. डॉक्‍टर यांच्या घरी तीन महिन्यापूर्वीच नवीन बाळाचे आगमन झाले होते. बाळ, नवी गाडीयाच्या आनंदात सारा घाटोळे परिवार होता. मात्र काळाला त्यांचे सुख बघवले नाही व चिमुकल्याचे पितृछत्र हरवले.

डॉ. युवराज हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याच्या मंगेवाडीचे राहणारे असल्याने त्यांच्या पार्थिवावर मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.