Khandala Accident News: पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर अपघातात साखरेच्या पोत्यांखाली अडकून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुल‍ाच्या खाली साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात साखरेच्या पोत्याखाली आडकल्याने एकाचा दुदैवी मृत्यू झाला. आज (शनिवार) सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने साखरेची पोती घेऊन निघालेला ट्रक क्र. (KA 28 D 5196) हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अमृतांजन पुलाच्या खाली पलटी झाला. यामध्ये पोत्याच्या खाली आडकल्याने एकाचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच बोरघाट महामार्गचे पोलीस कर्मचारी व अधिकारी, आयआरबीचे पथक व स्थानिक नागरिकांनी या घटनास्थळावर जात क्रेनच्या सहाय्याने ट्रक व पोती बाजूला करत मयत व्यक्तीला बाहेर काढले.

या अपघातानंतर खालापूर फुडमाॅलजवळ (किमी 36) दुसरा अपघात झाला. यामध्ये एका ट्रेलरला मागून दुसर्‍या ट्रेलने धडक दिली. यामध्ये देखील एकाचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.