BNR-HDR-TOP-Mobile

Khandala : पोलीस निरीक्षक कृष्णकुमार जाधव यांना उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षक पदक पुरस्कार

अरविंद गोकुळे यांना राष्ट्रपती गुणवत्तापूर्वक पोलीस पदक

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- खंडाळ‍ पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक कृष्णकुमार जाधव यांना उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षक तर अरविंद गोकुळे यांना राष्ट्रपती गुणवत्तापुर्वक पोलीस पदक प्रदान करण्यात आले. सलग तीन वर्ष खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राला उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षकाचा मान मिळाला आहे.

पोलीस अनुसंधान एवं विकास ब्युरो, गृह मंत्रालय यांचेकडून दरवर्षी पोलीस प्रशिक्षण केंद्रात उत्तम कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

पोलीस निरीक्षक कृष्णकुमार भिमाजी जाधव यांना यापूर्वी विशेष सेवा पदक तसेच अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडून उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून गौरविण्यात आलेले होते. जाधव हे कर्तव्यकठोर व अत्यंत सौजन्यशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्याचप्रमाणे पोलीस दलात विशेष उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक अरविंद तुळशीराम गोकुळे यांना गुणवत्तापूर्वक पोलीस पदक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

.