Khandala : मंकी हिलजवळ दरड कोसळली ; पुणे- मुंबई रेल्वेसेवा ठप्प

एमपीसी न्यूज- मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान दरड कोसळल्यामुळे पुणे- मुंबई रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. त्यामुळे पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही लांब पल्ल्यांच्या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

पुणे- मुंबई दरम्यानच्या दोन्ही रेल्वेमार्गावर दरड कोसळल्यामुळे अप, मिडल, तसेच डाउन असे तिन्ही रेल्वे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
अप लाईनवर बोगद्यामधे दरड कोसळल्यामुळे पूर्ण बोगद्यामध्ये दगड आणि मातीचा चिखल झाला आहे. डाउन आणि मिडल लाईनवरील दरड हटवण्याच काम रात्री अकरा वाजल्यापासून चालू आहे. तसेच अप लाईनच्या बोगद्यामधे अंधार आणि चिखल असल्यामुळे कामामधे अडथळा येत असल्याने पहाटे एक JCB मालगाडीवर लोड करुन पाठवण्यात आला आहे.

उद्या, सोमवारी सुटणाऱ्या खालील गाड्या रद्द-
51153 मुंबई भुवनेश्वर पॅसेंजर,
51154 भुसावळ- मुंबई पॅसेंजर,
12118 मनमाड मुंबई एक्स्प्रेस
12117 मुंबई- मनमाड एक्स्प्रेस
11025 भुसावळ- पुणे एक्स्प्रेस
11026 पुणे- भुसावळ एक्स्प्रेस
17411 मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस

खालील गाड्यांच्या सुटण्याच्या स्थानकात बदल-
आज सुटणारी 13202 पाटणा एक्स्प्रेस देवळाली स्थानकातून सुटेल
आज सुटणारी 12322 मुंबई हावरा मेल मनमाड स्थानकातून सुटेल
आज सुटणारी 12188 मुंबई जबलपूर गरिबरथ एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकातून सुटेल
आज सुटणारी 11027 मुंबई चेन्नई मेलपुणे स्थानकातून सुटेल
आज सुटणारी 17416 कोल्हापूर तिरुपती एक्स्प्रेस मिरज स्थानकातून सुटेल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.