Khandala : मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा विस्कळीत

एमपीसी न्यूज- खंडाळा घाटात जामरुंग व ठाकूरवाडी रेल्वे स्थानकादरम्यान आज, सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे आज मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या अपघातामुळे मुंबईहुन पुण्याकडे येणाऱ्या इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, मुंबईहून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्या आहेत. मात्र पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे. या घटनेमुळे मुंबई-पुणे दरम्यान अधिक बस चालवण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारला केली आहे.

1 जुलै रोजीच्या वेळापत्रकात झालेला बदल-

12169 पुणे-सोलापूर इंटरसिटी आणि 12170 सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द

11009 मुंबई- पुणे सिंहगड एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेऐवजी (दुपारी 2 वाजून 25 मिनिटे) आज दुपारी 4 वाजून 25 मिनिटांनी पुण्याकडे रवाना होईल

20821 पुणे – संत्रागाची हमसफर एक्स्प्रेस दौंड मनमाड मार्गे वळवण्यात आली आहे. या गाडीच्या निर्धारित वेळेमध्ये बदल करण्यात आला असून ही गाडी तिच्या निर्धारित वेळेऐवजी (सकाळी साडेदहा) दुपारी 4 वाजून 50 मिनिटांनी सुटेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.