Talegoan : खांडगे स्कूलने राबविले ‘रस्ता सुरक्षा अभियान’

एमपीसी न्यूज – मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलने ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविले. रस्ते अपघातास आळा बसावा तसेच नागरिकांत वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने शाळेने दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सोमाटणे टोल नाक्यावर रस्ता सुरक्षा अभियान राबविले.

शहरात वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे.वाहनचालकाकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत त्यामुळे वाहतूक कोंडी व किरकोळ अपघातही होत असतात. ही बाब लक्षात घेऊन समाजप्रबोधनाच्या हेतूने रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य शाळेतील इयत्ता नववी दहावीच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये हेल्मेट, सीटबेल्टची आवश्यकता, गाडी चालकाने काय करावे काय करू नये याविषयी विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना ‘आभार पत्रक’देऊन प्रोत्साहित करण्यात आले. तर वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना ‘आभार पत्रक’ देऊन प्रोत्साहित करण्यात आले. तर नियम न पाळणाऱ्याना विनंती करण्यात आली. व वाहतुकीचे नियम समजावण्यात आले. नागरिकांनीही या उपक्रमास भरभरून दाद दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका श्रीनिवासन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल. युनूस पटेल, सुनेत्रा पाठक, यशश्री आलम, गायत्री पिल्ले यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.