BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : खांडगे स्कूलचा केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळ संचलित मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलने केरळ मधील पूरग्रस्तांना धान्य स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे.

केरळ मधील पूरस्थितीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कित्येकांच्या आयुष्यावर आस्मानी संकटानं घाला घातला आहे. अशा परिस्थतीत आपण सर्वानी मदतीसाठी हातभार लावला पाहिजे. या उद्देशाने शाळेने केरळ मधील पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. धान्य स्वरूपातील मदत थेट केरळ मधील पूरग्रस्तांना मिळावी यासाठी शाळेने ‘रॉयल इंटरनॅशनल’ या संस्थेमार्फत तीनशे किलो तांदूळ देऊन धान्यस्वरूपात मदत केली आहे.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. शाळेच्या एस.एस.आर या उपक्रमांतर्गत स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मदतीसाठी सहभाग घेतला. यशश्री आलम व  सुनेत्रा पाठक यांनी मार्गदर्शन केले.

HB_POST_END_FTR-A4

.