BNR-HDR-TOP-Mobile

Kharghar: खासदार श्रीरंग बारणे यांनी युवकांना शिवबंधन बांधून केले स्वागत

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा झंझावात सर्वत्र पसरत चालला आहे. कळंबोली येथील नव्याने विकसित झालेल्या रोडपाली गावातील युवा कार्यकर्त्यांनी आज (सोमवारी) शिवसेनेत प्रवेश केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रवेश केलेल्या युवकांना शिवबंधन बांधून त्यांच्या हातात भगवा ध्वज देत त्यांचे पक्षात स्वागत केले.

खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, समन्वयक अनिल चव्हाण, आमदार मनोहर भोईर, शिरीष गरत, सल्लागार बबन पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, उप-महानगर प्रमुख दीपक गरत, राकेश गोवारे, कैलास पाटील, खारघर शहर प्रमुख शंकर ठाकूर, विभाग संघटक गिरीश धुमाळ, कार्यालय प्रमुख नितीन प्रमुख आदी उपस्थित होते.

  • शिवसेना पक्ष तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यातच रोडपाली येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेत जाहीर प्रवेश केला. या युवकांच्या प्रवेश करण्याने शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “रोडपालीमधील युवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. प्रवेश केलेल्या सर्व युवकांचे स्वागत असून पुढील काळात शिवसेनेचा समाजसेवेचा वसा उचलून युवकांनी काम करावे. आपल्या कामाच्या माध्यमातून लोकांसमोर जावे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींमध्ये त्यांच्या मदतीला धावून जायला हवे. शिवसेना अशा कार्यकर्त्यांच्या मागे कायम उभी आहे.”

  • दीपक खरात संपादित ‘बाळकडू’ या साप्ताहिकाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. बाळकडू हे साप्ताहिक शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित समाजसेवेसाठी वाहिलेले साप्ताहिक आहे.

HB_POST_END_FTR-A4

.