Vadgaon Maval News: मावळ पंचायत समितीमध्ये खरीप नियोजन व आढावा बैठक संपन्न

एमपीसी न्यूज : मावळ पंचायत समितीमध्ये खरीप नियोजन व आढावा बैठक संपन्न जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती उपसभापती यांच्या उपस्थितीत दूरभाष प्रणालीतून मावळ पंचायत समितीमध्ये खरीप नियोजन आढावा बैटक पार पडली.  

या बैठकीत खरीप हंगामाचे नियोजन, खते, बियाणे व औषधांचा पुरवठा, पतपुरवठा, पिककर्ज, चक्रीवादळामुळे झालेले नुकसान याबाबत आढावा घेण्यात आला. मावळ पंचायत समितीच्या सभापती निकिता घोटकुले यांनी मावळ तालुक्यात खते व बियाणे यांचा पुरेसा साठा पुरवण्याची मागणी केली.

खरीप हंगामामध्ये युरिया खताचे पुरेशा प्रमाणात पुरवठा आरसीएफ कंपनीतून रस्ते वाहतुकीचा मार्ग करण्यास आग्रह केला, मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना पॉलिहाऊस व नर्सरीचे प्रशिक्षण देणेबाबत योजना प्रस्तावित करण्यात विनंती केली.

उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांनी मावळ तालुक्यात बफर स्टॉकच्या माध्यमातून जास्तीत जास्त खत साठा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली व खताच्या वाढलेल्या किंमती कमी केल्याबाबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांचा अभिनंदन ठराव जिल्हा परिषद पुणे यांनी करावा अशी विनंती केली.

पंचायत समिती सदस्य गुलाब म्हाळसकर यांनी यांत्रिकीकरणावर भात लागवड यासाठी जिल्हा परिषदेतून योजना आणण्यास विनंती केली. तसेच 20 मे या जागतिक मधुमक्षिका दिनाचे औचित्य साधून आदिवासी भागातील शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनचे प्रशिक्षण देऊन त्यांना मधुमक्षिका पेटी देण्याची योजना प्रस्तावित करण्याची मागणी केली.

मागील दोन वर्षापासून मावळ तालुक्यात करपा रोगाचे व तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यावर उपाययोजना करणे बाबत तसेच रासायनिक खताचे व औषधांचे वापर कमी करून सेंद्रिय शेती करणाऱ्या भोयरे व वारू या गावातील गटांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील इतर गटांनी सेंद्रीय शेती करण्यास पुढे येण्यास आवाहन केले. सदर सर्व मागण्याचे विचार करून त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष, उपाध्यक्ष, कृषी समिती सभापती यांनी दिले.

मावळ तालुक्यात कोणत्याही खताची व बियाण्यांची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घेत असल्याचे बाबुराव वायकर यांनी सांगितले तसेच बांधावर खत वाटप, बांधावर बियाणे वाटप या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खत व बियाण्याचा पुरवठा करण्यात येण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.

चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावे याबाबत सूचना दिल्या तसेच जिल्हा परिषद निधीतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ देण्यात येण्याची खात्री त्यांनी दिली.

सदर आढावा सभेमध्ये मावळ तालुक्यातील खरीप हंगामाखाली येणाऱ्या १७  हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन कसे केले याबाबत तालुका स्तरीय आढावा तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे व पंचायत समिती कृषी अधिकारी संताजी जाधव यांनी दिला. हा आढावा सभेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विधाटे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, पशुसंवर्धन अधिकारी अंकुश देशपांडे, कृषी अधिकारी विक्रम कुलकर्णी, वसंत मोरे, दत्ता शेटे, रश्मी ओव्हळ उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य दुरुस्त प्रणालीतून सदर सभेत सहभाग घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.