BNR-HDR-TOP-Mobile

Khauadda : खास दिवाळीनिमित्त काळभोरनगर येथील मनभावन रेस्टॉरंटमध्ये दालबाटी, चूर्मा फेस्टिव्हल

INA_BLW_TITLE

(स्मिता जोशी)

एमपीसी न्यूज- सध्याचा जमाना फ्युजनचा आहे. संगीतात फ्युजन, फॅशनमध्ये फ्युजन, रंगसंगतीत फ्युजन. एकच एक प्रकारची कोणतीही गोष्ट आजकालच्या तरुणाईला मोनोटोनस वाटते. आजकाल सगळ्यांना प्रत्येक गोष्टीत वैविध्य हवे असते. कोणत्याही एकाच प्रकारच्या पद्धतीत अडकून पडायला आवडत नाही. खाण्याच्या बाबतीत सुद्धा हेच. आणि म्हणूनच हेल्थ कॉन्शस तरुणाईला खाण्यापिण्यात देखील वैविध्य हवे असते, त्यांचा वेगवेगळा चॉईस हवा असतो. एकाच प्रकारच्या डिशेसपेक्षा चायनीज, महाराष्ट्रीयन, साउथ इंडियन, पंजाबी, गुजराती, राजस्थानी अशा सगळ्या प्रकारच्या डिश ट्राय करायला आवडतात. त्याशिवाय हे सगळे खाद्यपदार्थ रुचकर आणि कमी कॅलरीचे देखील हवेत. बरं या खाण्याच्या पद्धतीदेखील खूप वेगवेगळ्या असतात. खाद्यपदार्थ जास्त तेलकट नकोत, चविष्ट हवेत, हेवी देखील नकोत. मग या सगळ्या गोष्टी सांभाळून पाककृती हव्या त्यादेखील चटपटीत त्याचबरोबर पोट भरणा-या आणि सर्वसमावशक. म्हणजे त्यात स्टार्टर्स हवेत, भाज्या, सलाड, चटणी, फुलका, पराठा आणि स्वीटदेखील हवे.

नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन फक्त तरुणच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांना आवडेल अशी सर्वसमावेशक थाळी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे काळभोरनगर, चिंचवड येथील मनभावन रेस्टॉरंट. येथे गुजराती आणि राजस्थानी थाळी यांचे मिश्रण असलेली थाळी मिळते. नव्यानेच सुरु झालेल्या मनभावन रेस्टॉरंट येथे दिवाळीचे स्पेशल आकर्षण म्हणजे खास दाल बाटी, चुर्मा स्पेशल थाळी मिळणार असल्याचे अमित ठाकूर यांनी सांगितले.

जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर काळभोरनगर येथे अगदी रस्त्यावर असणा-या मनभावन या रेस्टॉरंटचा लूक आपल्याला अगदी हवेलीत घेऊन जातो. चमकदार रंगीबेरंगी खिडक्यांची तावदाने राजस्थानातील हवेलीमधील खिडक्यांची आठवण करुन देतात. एकंदरीने अॅम्बियान्स आवडून जातो. त्यातच वेटर समोर आणून ठेवतात भरपूर वाट्या असलेली थाळी. वेलकम ड्रिंकने आपण जेवणाची सुरुवात करतो. मग ताटात येते ते स्नॅक्समध्ये मूगदाळ कचोरी, संगम ढोकळा, सोयाबीन पकोडा, डाळढोकळी, मसाला ढोकळा यापैकी कोणतेतरी दोन पदार्थ. नंतर सब्जीमध्ये खास सुरती उंधियो, राजस्थानी गवार, राजस्थानी गट्टा, पनीर हंडी, पनीर बटर मसाला, पनीर लसुणीया, जैसलमेरी चणा, देसी चणा, बैंगन भरता यापैकी कोणत्याही भाज्या त्यादिवशी जसा मेन्यू असेल त्याप्रमाणे आपल्याला मिळते. शिवाय दाल राइस, गुजराती कढी खिचडी, तडका दाल, राजस्थानी खिचडी येथे आपल्यासाठी तयार असते. स्वीटचे तर खूपच वैविध्य आहे. स्पेशल सीताफळ रबडी, ड्रायफ्रूट बासुंदी, मॅंगो हलवा, अॅपल रबडी, केसरी हलवा, कोकोनट हलवा, मोदक, ड्रायफ्रूट जिलबी एवढी गोडाची फौज सज्ज आहे. नुसती नावे वाचूनच तोंडाला पाणी सुटले ना? येथील स्पेशालिटी काय असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर त्याची देखील मोठी यादी आहे. दही वडा, खांडवी म्हणजे सुरळी वडी, दालबाटी, सीताफळ रबडी, सुरती उंधियो, गट्टे की सब्जी अशा एकापेक्षा एक खमंग आणि चटकदार डिशेस येथे येऊन ट्राय करायलाच हव्यात.

याशिवाय येथे पार्सलची विशेष सोय आहे. पाच लोकांना पुरेल एवढे जेवण फक्त 999 रुपयांमध्ये आणि तीन लोकांसाठी 599 रुपयांमध्ये येथे उपलब्ध आहे. तसेच मंगळवारी नेहमीच्या रेटपेक्षा चक्क 100 रुपयांची सूट म्हणजे 249 रुपये. शनिवार, रविवार थाळीची किंमत 374 रुपये, एरवी दररोज 349 रुपयांची थाळी मिळते. वुमन्स वेनस्डेला खास महिलांसाठी नेहमीच्या रेटमध्ये चक्क 25 % सूट मिळते. तसेच किटी पार्टी, बर्थ डे पार्टी, फॅमिली गेटटुगेदर, साठीशांत यासारख्या आपल्याकडे असणा-या घरगुती समारंभासाठीदेखील येथे सुमारे साठ ते सत्तर लोकांसाठी मस्त जेवणाची सोय होते. आऊटडोअर केटरिंगची देखील येथे व्यवस्था आहे. मनभावन रेस्टॉरंट दुपारी बारा ते चार आणि संध्याकाळी सात ते अकरा या वेळेत सुरु असते. मग यंदाची दिवाळी थोडी हटके सेलिब्रेट करायची असेल तर गुजराती राजस्थानी जेवण ट्राय करण्यासाठी मनभावनमध्ये जायलाच हवे. मग ते पाडव्यानिमित्त पत्नीला घेऊन जा किंवा भाऊबीजेला जाऊन भाऊरायाला सरप्राइज द्या. दिवाळीत तेच तेच खाऊन कंटाळा येतो ना मग मनसोक्त दालबाटी, चूर्म्यावर ताव मारा. शिवाय जोडीला इतरही पदार्थ आहेतच.

पार्सल आणि टेबल बुकींगसाठी संपर्क करा –
मनभावन – 99757 92865, 74100 12865

पत्ता – मनभावन, ५, जेम्स क्रिस्टल, स्टार बजार जवळ,
नेक्स्ट टू पॅन्टलून्स, काळभोरनगर, जुना पुणे – मुंबई महामार्ग,
चिंचवड.

 

Manbhavan – Premium Thali Restaurant | Dining Hall Near Me | Dining Hall In Pimpri Chichwad
5, Gems crystal, kalbhor Nagar, next to pantaloons, Kalbhor Nagar, MIDC, Chinchwad, Pune, Maharashtra 411019
099757 92865

https://goo.gl/maps/FoWPF6tZ9QS2

HB_POST_END_FTR-A2

.