Khed : कंत्राटी कामगाराकडून कंपनीत 50 लाखाचा अपहार

एमपीसी न्यूज – कंपनीतील कंत्राटी कामगाराने 50 लाख 71 हजार रुपयांच्या (Khed) मालाचा अपहार केला. हा प्रकार 31 डिसेंबर ते 17 जानेवारी या कालावधीत कुरुळी येथील महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीत घडला.
अमित विरबहादूर सिंग (वय 45 रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल उत्तम गंजे (वय 30, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. आरोपी अमोल हा कंत्राटी कामगार आहे. लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊनमधील साहित्य अमोल याच्या ताब्यात ठेवले होते. त्यातील 50 लाख 71 हजार 503 रुपये किमतीच्या साहित्याचा अपहार करून विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत (Khed) म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
Pimple Nilakh News : पिंपळे निलख येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावले