BNR-HDR-TOP-Mobile

Khed : खेड घाटातील बाह्यवळण कामे लवकरात लवकर पूर्ण करा- खासदार डॉ. अमोल कोल्हे

अधिकारी आणि प्रकल्पबाधीत शेतक-यांसोबत केली घाटाची पाहणी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (शुक्रवारी) पुणे-नाशिक रस्त्यावरील खेड घाटाची बाधित शेतकरी आणि अधिका-यांसमवेत पाहणी केली. शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. घाटातील बाह्यवळण कामे लवकर पूर्ण करुन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना केल्या आहेत.

खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड संचालक धैर्यशील पानसरे, तुकाईवाडीचे सरपंच महेंद्र ठिगळे, प्रवीण कोरडे यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.

पुणे-नाशिक मार्गावरची वाहतूक समस्या ही दिवसें-दिवस वाढत चालली आहे. याकडे कदापी दुर्लक्ष करून चालणार नाही. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याच खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. तसेच प्रकल्पबाधित शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शेतक-यांना विश्वासात न घेता अधिका-यांना सोबत घेऊन जमीन अधिग्रहित केली तसेच स्वार्थासाठी व स्वत:ची जमीन वाचविण्यासाठी आमच्या जमिनी घालवल्याचा आरोप शेतक-यांनी केला.

HB_POST_END_FTR-A2

.