Khed Corona Update : तालुक्यात आज 22 नवे रुग्ण; 30 जणांना डिस्चार्ज तर 20 वर्षीय युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात शनिवारी 14 ऑगस्ट 2021 रोजी 10 गावे आणि 2 पालिकांमध्ये 22 रुग्ण मिळून आले आहेत. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मरकळ येथील अवघ्या 20 वर्षीय युवकाचा बुधवारी (दि. 11 ऑगस्ट) सह्याद्री रुग्णालयात येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला असल्याचे शनिवारच्या दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 896 झाला आहे. यापैकी 33 हजार 150 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. दिवसभरात 30 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्यस्थितीत 262 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 1 मृत्यूने 484 एवढा झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 17 रुग्ण, चाकण 4, आळंदी 1, राजगुरुनगर 0 असे एकुण 22 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
आंबेठाण, मरकळ,महाळुंगे,खालुंब्रे,पाडळी, भोसे मध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला असून कुरुळी व वरुडे मध्ये प्रत्येकी 2 रुग्ण आणि चऱ्होली खु. व राक्षेवाडी मध्ये प्रत्येकी 3 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.