Khed Corona Update : खेडमध्ये 27 नवे रुग्ण; 3 मृत्यू; 14 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात गुरुवारी (दि. 26 ) 15 गावे आणि 1 पालिकेमध्ये 27 रुग्ण मिळून आले आहेत. तर 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

भोसे येथील 60 वर्षीय पुरुषाचा सी सी सी आवसरी येथे , वाडा येथील 70 वर्षीय पुरुषाचा एस डी एच मंचर येथे आणि कुरुळी येथील 68 वर्षीय पुरुषाचा ऑटो क्लस्टर चिंचवड येथे मृत्यू झाला असल्याचे गुरुवारच्या दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 254 झाला आहे. यापैकी 33 हजार 488  रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. गुरुवारी दिवसभरात 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 245 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 3 मृत्यूने 512 एवढा झाला आहे.

सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 20 रुग्ण, चाकण 4, आळंदी 0, राजगुरुनगर ० असे एकुण 27 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
बिरदवडी,चऱ्होली खु. , कडाचीवाडी, केळगाव, मरकळ, महाळुंगे, ताळे, वाडा, मोहकल , सिद्धेगव्हाण , वाकी बु. या गावांमध्ये प्रत्येकी 1  रुग्ण तर वासुली , चिंबळी, चिंचबाईवाडी येथे प्रत्येकी 2 रुग्ण आणि गुंडाळवाडी येथे 3 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.