Khed Corona Update : खेड मध्ये दिवसभरात 37 नवीन कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात रविवारी (दि.18) 18 गावे आणि 2 पालिकांमध्ये 37 रुग्ण मिळून आले आहेत. तर वाफगाव येथील 38 वर्षीय पुरुषाचा ससून सर्वोपचार हॉस्पिटल मध्ये शुक्रवारी (दि. 16 ) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आळंदी मध्ये मागील 24 तासात एकही नवीन रुग्ण मिळून आलेला नाही ; तसेच चाकण व राजगुरुनगर शहरातील रुग्ण संखेत देखील मोठी घट झाली आहे.

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 32 हजार 782 झाला आहे. यापैकी 32 हजार 13 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. दिवसभरात 37 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 299 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 1 मृत्यूने 470 एवढा झाला आहे सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 32 रुग्ण, चाकण 4, राजगुरुनगर 1 असे एकुण 37 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
चास, दोंदे, वाशेरे, गोसासी, कडूस, केळगाव, कोयाळी, कोये ,कुरुळी,शिरगाव या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला असून , शिरोली , टाकळकरवाडी, वाफगाव, येलवाडी , मिरजेवाडी या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण, खराबवाडी मध्ये 3, शिवे मध्ये 4 आणि चर्होली खु. मध्ये 5 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.