Khed Corona Update : खेड मधील रुग्ण संखेत मोठी घट; 24 रुग्ण; 1 मृत्यू; 37 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात रुग्ण संख्येत दिलासादायक घट होत आहे. मागील दोन दिवसांत निच्चांकी रुग्णांची नोंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या पालिकांमध्ये देखील रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.

रविवारी (दि. 25) गावे 16 आणि 2 पालिकांमध्ये 24४ रुग्ण मिळून आले आहेत. तर कुरकुंडी येथील 38 वर्षीय महिलेचा शनिवारी (दि.24 जुलै ) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

रविवारी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 187 झाला आहे. यापैकी 32 हजार 407रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. दिवसभरात 37 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्यस्थितीत 305 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 1 मृत्यूने 475 एवढा झाला आहे.

सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 22 रुग्ण, चाकण 1, आळंदी 0, राजगुरुनगर 1 असे एकुण 24 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
बिरदवडी, चिंबळी, दावडी, गोसासी, काळूस, किवळे, कुरकुंडी, कुरुळी, महाळुंगे, शिवे, वडगाव पाटोळे, वाफगाव या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे. कनेरसर व शेलपिंपळगाव मध्ये प्रत्येकी 2 रुग्ण तर चऱ्होली खु. आणि वरुडे येथे प्रत्येकी 3 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.