Khed Corona Update : तालुक्यात दुसऱ्या लाटेच्या प्रकोपानंतर दिलासा; निच्चांकी रुग्ण नोंद

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर मागील काही महिन्यातील सर्वात निच्चांकी रुग्ण नोंद सोमवारी (दि. 6) झाल्याची अत्यंत दिलासादायक बाब समोर आली आहे.

राजगुरुनगर व आळंदी या दोन्ही पालिकांच्या हद्दीत तर एकही रुग्ण मिळाला नसल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे. चाकण पालिकेसह तालुक्यातील केवळ पाच गावांमध्ये नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

खेड तालुक्यात सोमवारी 5 गावे आणि 1 पालिकेत फक्त 8 रुग्ण मिळून आले आहेत ; त्यामुळे पुढील काळात दुसरी लाट ओसरण्याची अपेक्षा खेड मधील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 615 झाला आहे. यापैकी 33 हजार 759 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. दिवसभरात 27 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्यस्थितीत 282 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत.

खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 574 एवढा झाला आहे. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 6 रुग्ण, चाकण 2, आळंदी 0, राजगुरुनगर 0 असे एकुण 8 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
चिंबळी, मेदनकरवाडी, कोहिनकरवाडी,पिंपळगाव या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण तर वरुडे येथे 2 रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.