Khed : रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्याला वाहनाची धडक; पत्नीचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पायी रस्ता ओलांडणाऱ्या पती-पत्नीला एका (Khed) वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीच्या जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.7) दुपारी खेड येथील कुरळी गावात झाला.

याप्रकरणी परवेज अल्लाउद्दीन अंसारी (वय 25, रा कुरळी खेड ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Talegaon : गतीरोधकावरून गाडी स्लीप होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी हे कोरडे (Khed) फाटा येथे रस्ता ओलांडत होते. यावेळी अज्ञात चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेमध्ये फिर्यादी यांची 24 वर्षीय पत्नी गंभीर जखमी झाली व तिचा यात मृत्यू झाला. यावरून महाळुंगे पोलिसांनी गाडी चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.