Khed Crime : भाडे तत्वावर चालवायला दिलेल्या गाडीची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या चालकास अटक

एमपीसी न्यूज – भाडे तत्वावर चालवायला दिलेल्या गाडीचे (Khed Crime) भाडे न देता गाडीची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या चालकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 20 ऑगस्ट 2022 ते आज अखेरपर्यंत खेड येथे घडला.

याप्रकरणी मंगळवारी (दि.8) महिलेने चाकण पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून चाकण पोलिसांनी किसन आनंदराव हांबरडे (मुळ रा. नांदेड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना विश्वासात घेऊन आरोपीने फिर्यादीची गाडी टोयोटा इटीयॉस (एमएच14 एफसी 0151) ही गाडी भाडे तत्वावर चालविण्यास घेतली. त्यासाठी दरमहा 20 हजार भाडे देण्याचेही ठरले. चांगला मोबदला व चालक मिळाल्याने फिर्यादीने त्याला होकार दिला. त्यानुसार ऑगस्ट 2022 पर्य़ंत आरोपीने महिन्याला भाडे ही दिले. मात्र त्याने त्यानंतर भाडे देणे बंद केले.

Talegaon Dabhade accident : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

फोन केला असता भाडे देतो असे सांगून फिर्यादीची दिशाभूल केली. काही दिवसाने (Khed Crime) आरोपीने राहते ठिकाण बदलले. पुढे फोन केला असता त्याचा फोनही बंद लागत होता. यावेळी आरोपीने गाडी देखील सोबत नेली होती. कार नाही, भाडे नाही म्हणून फिर्यादीने चौकशी केली असता गाडीची परस्पर आरोपीने विल्हेवाट लावल्याचे समोर आले. यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.