Khed : पुर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाला कोयत्याने व दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज पुर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्राला कोयत्याने व दगडाने मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार खेड (Khed) जवळील खरपुडी फाट्याजवळ बुधवारी (दि.10) दुपारी घडला.

याप्रकरणी अल्पवयीन मुलाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तीन अल्पवयीन मुले व एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi : निगडीत 7 दिवसीय आमदार चषक स्पर्धा उत्साहात संपन्न

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाचा राग काढून आरोपींनी संगनमताने कोयत्याने व दगडाने फिर्यादी व त्यांच्या मित्राला मारहाण करत जखमी केले. अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नसून यावरून चाकण पोलीस(Khed) पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.