Mahalunge Crime News : कंत्राट मिळविण्यासाठी कंपनीवर दबाव आणणाऱ्यांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीतील कामगारांची वाहतूक करण्याचे कंत्राट आपल्याला मिळावे यासाठी एकाने कंपनीवर दबाव आणला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात (Mahalunge Crime News) आला आहे. ही घटना ऑगस्ट 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली.

रवींद्र गाढवे (रा. सावरदरी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी योगेश अर्जुन पेटकर (वय 36) यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.

Pune Crime News : नामांकीत कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने 26 वर्षीय महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे एमआयडीसी परिसरात सावरदरी येथे आरोपी रवींद्र गाढवे याच्या जागेमध्ये स्पार्क मिंडा नावाची कंपनी आहे. त्याच्या जागेचा मोबदला आरोपीला दिला जात आहे. असे असताना देखील कंपनीमध्ये कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसचे कंत्राट आपल्याला मिळावे, अशी मागणी आरोपी करीत होता. त्यासाठी त्याने कंपनीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आरोपी रवींद्र गाढवे याने कंपनीपासून काही अंतरावर कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसेस अडवून ठेवल्या. याबाबत कंपनी प्रशासनाने पोलिसांकडे धाव घेत गुन्हा नोंदवला. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.