Khed : जागेत मुरूम टाकण्यावरून दोघांना जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- जागेत मुरूम टाकण्यावरून पाच जणांनी दोघांना(Khed) दमदाटी केली. तसेच मुरूम टाकणाऱ्या डंपर चालक आणि सुपरवायजर यांना देखील मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 26) सकाळी खेड तालुक्यातील शिंदे गावात घडली.

अर्जुन हनुमंत पानमंद (वय 49, रा. शिंदे, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास जगन्नाथ पानमंद, आनंद जगन्नाथ पानमंद, उत्तम जगन्नाथ पानमंद, बेबी जगन्नाथ पानमंद, जगन्नाथ रामचंद्र पानमंद (सर्व रा. शिंदे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai : ऑल इंडिया लॉयर्स युनियन महाराष्ट्र राज्य तिसरे अधिवेशन पार पडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Khed)आणि त्यांचा मुलगा हे त्यांच्या जागेत डंपरने मुरूम टाकत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मुरूम न टाकण्यासाठी दमदाटी केली. डंपरच्या समोर दुचाकी लाऊन अडवणूक केली. तसेच डंपर चालक आणि सुपरवायजर यांना डंपर जाळण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.