BNR-HDR-TOP-Mobile

Khed : कांदा बीजोत्पादन मार्गदर्शन शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्रामार्फत कांदा बीजोत्पादन मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये कांदा बीजोत्पादन यशस्वी होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

दोंदे ता खेड येथे राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ राजीव काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोंदे येथील प्रगतिशील शेतकरी अंकुश कोहिनकर यांच्या कांदा बीजोत्पादन प्लॉटवर मार्गदर्शन केले.

यावेळी दोंदे येथील प्रगतिशील शेतकरी दादा पाटील कोहिनकर , शंकरराव उधाने, मोहन सुकाळे, आनंदराव उधने, दादाभाऊ टोके, माजी सरपंच दत्तोबा बोराडे, भगवान सुकाले, अमोल सुपेकर, संपत बारणे, देवस्थान समितीचे अतुल भालशिंगे, चेतन कोहिनकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते

.

HB_POST_END_FTR-A1
.