Khed : चुकीच्या जमीन मोजणी विरोधात भौसे गावच्या शेतकऱ्यांची उप अधिक्षकांकडे धाव

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील (Khed) भौसे गावातील गट नंबर 725 येथील जमिनीची मोजणी ही चुकीच्या पद्धतीने झाली असून ती पुन्हा करण्यात यावी, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याची तक्रार किसन शंकर गव्हाणे व गोपीचंद बबन गायकवाड या शेतकऱ्यांनी खेड तालुक्याचे भूमी अभिलेख विभागाचे उप अधिक्षकांकडे केली आहे.

Pimpri News : महाविद्यालयीन काळातील संस्कार करिअरसाठी दीपस्तंभप्रमाणे – डॉ. गोविंद कुलकर्णी

या निवेदनात म्हटले आहे की, भौसे येथील गट नंबर 725 ही 14 डिसेंबर 2022 रोजी हद्द मोजणी झाली. मोजणी नंबर 25/35/25/36 चुकीचा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून वादाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोजणीमध्ये उत्तरेकडील बाजूस वनपरिक्षेत्र चाकण यांचा वनविभाग आहे त्या हद्दी शेतकऱ्याचे 50 फुट क्षेत्र दाखविण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांना वहिवाटीनुसार क्षेत्र मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.

याविषयी एमपीसी न्यूजसोबत बोलताना (Khed) किसन गव्हाणे म्हणाले की, यासाठी आम्ही वारंवार अर्ज करून देखील यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. संबंधित ऑफिसमधील अधिकाऱ्यांना याबद्दल विचारले असता ते अधिकारी बोलतात की तीन पट पैसे भरा व मग मोठे साहेब येऊन तुमचे हद्द कायम करून देतील अशी उत्तरे मिळत आहेत. आम्ही शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची? अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.