Khed News : वाडी वस्तीवरील मुली, महिलांना संघटीत करण्यासाठी वर्क फॉर इक्वॅलिटी संस्थेचा ‘गर्ल्स क्लब’

एमपीसी न्यूज – वाडी वस्तीवरील मुली, महिलांना संघटीत करण्यासाठी वर्क फॉर इक्वॅलिटी संस्थेच्या वतीने ‘गर्ल्स क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. नुकतेच खेड तालुक्यातील शेलू आणि येनाडे या दोन आदिवासी पाड्यांवर ‘गर्ल्स क्लब’ची स्थापना केली. असंघटीत समाजातील मुली आणि महिलांना संघटीत करण्यासाठी तसेच, आचार विचारांचे आदान प्रदान होण्याच्या उद्देशाने या क्लबची स्थापना करण्यात आली आहे.

महिला आणि मुलींना पुढे येऊन बोलण्याची, आपले मत मांडण्याची संधी निर्माण व्हावी म्हणून ‘वर्क फॉर इक्वॅलिटी’ ही सामाजिक संस्था काम करत आहे. तळागाळातील मुली व महिलांचे संघठन व्हावे तसेच, त्यांचे प्रश्न समाजातील इतर घटकांपर्यंत पोहचावे यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. याच कामाचा भाग म्हणुन संस्थेच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांमध्ये तरुण मुलींचे गर्ल्स क्लब स्थापन केले जात आहेत.

गर्ल्स क्लब वाड्या वस्त्यांच्या मुलींसाठी अनुभवांचे आणि विचारांचे आदान प्रदान करण्याचे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून पुढे येत आहे. क्लबच्या माध्यमातून मुली केवळ आपलेच प्रश्न पुढे मांडत नाहीत तर, मुलांच्या अधिकारांच्या प्रश्नांवर देखिल काम करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.