Khed News : पोलिसांसमोरच दोन गटांची आपसात हाणामारी

एमपीसी न्यूज – भांडण (Khed News) सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांसमोर दोन गटातील लोकांनी आपसात हाणामारी केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. ही घटना शनिवारी (दि. 3) रात्री खेड तालुक्यातील पाईट येथे घडली.

दिनेश शंकर रौंधळ, ओंकार विष्णू रौंधळ, हृतिक लक्ष्मण रौंधळ, अनिकेत शंकर खेंगले यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह सोमनाथ विष्णू रौंधळ (सर्व रा. पाईट, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाईट गावात भांडण सुरु असल्याबाबत चाकण पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक गणेश वाडेकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले. रात्री नऊ वाजताच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी भांडण सुरु असल्याने पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना समजावून सांगत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांचा आदेश न मानता थेट (Khed News) पोलिसांसमोरच झोंबाझोंबी करून आपसात वाद घातला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.