Khed : कंपनतील तब्बल दोन कोटींच्या मशीनची परस्पर विक्री करत केली मालकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेडमध्ये ठेवलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या 21 मशीन मालकाच्या परस्पर विकून विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यातील खराबवाडी येथे टच ईलॅस्टिक्स या कंपनीत 31 नोव्हेंबर 2022 ते 1 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला.

प्रसनजीत शीतलचंद्र दास (वय 48, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश संभाजी माळी (रा. शिवाजीनगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दास यांनी त्यांच्या कंपनीतील सुमारे दोन कोटी रुपयांच्या 21 मशीन गणेश माळी याच्या शेडमध्ये 31 नोव्हेंबर 2022 रोजी ठेवल्या होत्या. काही दिवसांनी दास हे त्यांच्या मशीन पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या मशीन शेडच्या बाहेर ताडपत्रीने झाकलेल्या दिसल्या.

Chinchwad News : पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली – शरद पवार

त्यानंतर काही दिवसांनी दास मशीन पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या मशीन शेडमध्ये अथवा परिसरात दिल्या नाहीत. माळी याने दास यांच्या परस्पर सुमारे दोन कोटी रुपयांच्या 21 मशीन विकून विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.