Khed : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Khed ) यांनी रविवारी ( दि. 24 ) एका बैठकीत पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या , असा भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संवाद बैठकीत सल्ला दिला. या त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ यांचे वतीने करण्यात आला.

यासाठी राजगुरुनगर ( खेड ) तहसीलदार यांना (दि.26 रोजी) निवेदन देण्यात आले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे वतीने अप्पर तहसीलदार स्नेहा सिंदे व महसूल नायब तहसीलदार आर बि बिजे यांनी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते निवेदन स्वीकारले.

Hinjawadi : गणेश विसर्जनानिमित्त हिंजवडी मधील वाहतुकीत बदल

तसेच संबंधित बेताल वक्तव्या प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागावी अशी मागणी ही करण्यात आली असल्याचे हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष एम. डी. पाखरे, खजिनदार सुनील बटवाल, सदस्य अनिल जोगदंड व बद्रीनारायण घुगे, खेड तहसीलदार कार्यालयातील शैलेश कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.याबाबत माहिती अर्जुन मेदनकर ( Khed ) यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.