Khed : पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी; हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची मागणी

एमपीसी न्यूज : पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी (Khed) करणे, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवणे आणि पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याबाबत निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री नावे हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार खेड कार्यालयात नायब तहसीलदार मदन जोगदंड यांना देण्यात आले.

निवेदन दिल्यानंतर तहसील कार्यालयाबाहेर पत्रकार संरक्षण कायद्याचे छायांकित प्रतिची होळी करण्यात आली. तसेच पत्रकारांवर वाढत्या हल्लांचा जाहीर निषेध करण्यात आला.

Dapodi : फुगेवाडी परिसरातून 50-60 पाण्याचे मीटर चोरीला

या वेळी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड अध्यक्ष अर्जुन मेदनकर, निमंत्रक अविनाश राळे, उपाध्यक्ष महादेव पाखरे, (Khed) कोषाध्यक्ष सुनील बटवाल, कार्यकारिणी सदस्य बद्रीनारायण घुगे, नाझिम इनामदार, रोहिदास होले, सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण, सुनील थिगळे, प्रशांत नाईकनवरे आदी उपस्थित होते. याबाबत माहिती अर्जुन मेदनकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.