Khed : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पती वारंवार त्रास देत असल्याने त्याच्या (Khed) त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 29 सप्टेंबर रोजी खेड तालुक्यातील वासुली येथे घडली.

 

आत्महत्या केलेल्या 24 वर्षीय विवाहितेचे वडील मंटू राम श्रीहंसराज राम (वय 48, रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी यांचे जावई अमरनाथ रामपरवेश भारती (वय 26, रा. उत्तर प्रदेश. सध्या रा. वासुली, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kondhwa : वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या(Khed )मुलीचा आरोपी अमरनाथ याच्यासोबत फेब्रुवारी 2023 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला वारंवार दारू पिऊन शिवीगाळ, मारहाण करत त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने 29 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास राहत्या घरी छताच्या लोखंडी हुकला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमरनाथ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.