Pune/KhedShivapur : टोलनाका हटाव कृती समितीचे ‘टोल हटाव’ आंदोलन मागे; खासदार सुप्रिया सुळे वाहतूक विकासमंत्री यांच्याशी चर्चा करणार

एमपीसी न्यूज – पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर येथे टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने ‘टोल हटाव’ आंदोलन आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी टोलनाक्यावर तब्बल दोन तास अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. या महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला होता.

स्थानिक आमदारांना मध्यस्थानी ठेवून त्यांचे प्रश्न विचारात घेत सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. देशाचे रस्ते आणि वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याशी या संदर्भात बैठक घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

स्थानिक प्रवाशांनाही टोल आकारला जात असल्याने याचा त्रास हा आर्थिक रुपात सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी भोर ,वेल्हा आणि मुळशी या भागातील प्रवाशांसाठी दोन डेडिकेशन मार्गिका तयार करण्याचे आश्वासन हे एन.एच.आय. घ्या, अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

आता नितीन गडकरींच्या बैठकीत टोल बंद करण्यासंर्भात काय निर्णय होतो? हे पाहणं महत्वाचे आहे.

खेडशिवापूर टोलनाका ताबडतोब बंद करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी
खेडशिवापूर हा टोलनाका भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ही टोलवसुली काम अपूर्ण असल्यामुळे 1 जानेवारी 2014 पासून बंद व्हायला हवी होती. मात्र, ती सुरू ठेवून गेल्या 9 वर्षांत तब्बल 1780 रुपयांची लुबाडणूक जनतेकडून ठेकेदाराने केली आहे. मार्च 2013 पर्यंत या रस्त्याला 6 पदरी करण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, 2020 उजाडल्या नंतरही हे काम प्रलंबित आहे त्यामुळे हा टोलनाका ताबडतोब बंद करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.