Khelo India : खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत 103 पदकांसह महाराष्ट्राचं अग्रस्थान कायम

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील (Khelo India) आपले वर्चस्व सिद्ध केले. महाराष्ट्राने आता 38 सुवर्ण, 34 रौप्य आणि 31 कांस्यपदके मिळवत 103 पदकांसह आघाडी कायम राखली आहे. हरियाना, मध्य प्रदेश यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच कायम आहे.

हरियाना (25, 20, 18) अशा 63 पदकांसह दुसऱ्या, तर मध्य प्रदेश (25, 13, 23) अशा 61 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राला बुधवारी जलतरण आणि सायकलिंगच्या सुवर्णपदकांनी बाजू भक्कम करता आली. अपेक्षा फर्नांडिसने जलतरणात, तर पूजा दानोळेने सायकलिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक साजरी केली.

महाराष्ट्र महिला कबड्डी संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरित दाखल झाला आहे. उपांत्य फेरित महाराष्ट्राच्या संघानं हिमाचल प्रदेशच्या संघावर 12 गुणांनी विजय मिळवला. (Khelo India) उपांत्य फेरित महाराष्ट्रानं 44-31 अशा फरकाने हिमाचल प्रदेशला नमवलं. कर्णधार निकिताच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाने अंतिम फेरीचा पल्ला गाठला.  अंतिम फेरीत महाराष्ट्राचा सामना हरयाणा बरोबर होणार आहे.

Alandi News : इंद्रायणी नगर मध्ये 82 वर्षाचे आजोबा करत आहेत वृक्षसंवर्धनाचे कार्य

महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघानं यजमान मध्य प्रदेश संघावर 17 गुणांनी विजय मिळवत उपांत्या फेरी गाठली. वैभव रबाडेच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र संघाने गटातील शेवटच्या सामन्यात यजमान मध्य प्रदेशला हरवलं. महाराष्ट्र संघाने 50-37 असा तेरा गुणांच्या आघाडीन विजय मिळवला.

आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट पूजा दानोळेने आज जबलपूरच्या ट्रॅकवर आयोजित सायकल रोड रेस मध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. तिने महिला गटातील 20 किमीची ही रेस 36 मिनिट 1.745 सेकंदात पूर्ण केली. हे तीचं तीसरं सुवर्ण पदक. या स्पर्धेत महाराष्ट्राच्याच अपूर्वा गोरेनं रौप्य पदक पटकावलं.

महाराष्ट्र मल्लखांब संघाला दुसरं रौप्यपदक मिळालं आहे.राष्ट्रीय खेळाडू शार्दुल जोशीच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे महाराष्ट्राला रौप्य पदक मिळालं. (Khelo India) त्याने वैयक्तिक ओव्हर ऑल गटात 26.10 गुणांची कमाई करत  आपलं दुसरं स्थान पक्क केलं. या गटात यजमान मध्य प्रदेश संघाचा प्रणव सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.