Khopoli : भरधाव स्विफ्ट कारची टँकरला धडक तीन महिलांसह चौघांचा मृत्यू ; दोन जखमी

एमपीसी न्यूज- समोरून निघालेल्या टँकरला मागून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारची धडक बसून कारमधील चारजण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. हा भीषण अपघात पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर रसायनीजवळ आज पहाटेच्या सुमारास झाला. जखमींवर कामोठेच्या एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील सर्वजण सातारा येथील लग्न समारंभ उरकुन मुंबईला जात असताना अपघात झाला.

अक्षय कोकरे, सविता मोटे, राणी खर्जे आणि त्यांची बारा वर्षाची मुलगी रिया खर्जे अशी मृतांची नावे आहेत.

हे सर्वजण सांगली येथे लग्नसमारंभ आटोपून रात्री आठच्या सुमारास स्विफ्ट डिझायर (एम एच 11 सी एच 1189) कारमधून मुंबईकडे निघाले होते. अक्षय कोकरे कार चालवत होते. या अपघातात चक्काचूर झाला. अशी माहिती रसायनी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुजाता तानवडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.