_MPC_DIR_MPU_III

Khopoli News: एक्सप्रेस-वेवर बंदूक दाखवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – मुंबई- पुणे एक्सप्रेस-वेवर बोरघाटात वाहतूक कोंडीतून रस्ता मोकळा करण्यासाठी समोरील वाहनचालकांना रिव्हॉल्व्हरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढत असल्याची घटना गुरुवारी (28 जानेवारी) रात्री घडली होती. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोनजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

एक्सप्रेस-वेवर बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.  गुरुवारी रात्री मुंबई लेनवर पुण्याकडे बोरघाट 44/200 या ठिकाणी कारला रस्ता मोकळा करून देण्यासाठी बंदूक दाखवत रस्ता मोकळा करीत असल्याचा व्हिडिओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये एक कारचालक आणि त्याच्यासोबत असणारी एक व्यक्ती भर रस्त्यात वाहनांच्या गर्दीत रिव्हॉल्व्हरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढताना दिसत आहेत.

खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी तातडीने तपास करीत कार नंबरच्या आधारे संपूर्ण माहिती कारमधील प्रवाश्यांना खोपोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.