Kidnapping case : अपहरण करून एकाला गंभीर जखमी केल्याने पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज : एका व्यक्तीचे अपहरण करून गंभीर जखमी केल्याने पाच जणांना अटक करण्यात आले आहे.(Kidnapping case) ही घटना मंगळवारी 20 सप्टेंबरला रात्री 10  वा. च्या सुमारास चिंचोली गावात घडलेली आहे.

याबाबत महेश यमगड्डी, वय 22 वर्षे, रा. भैरवनाथ मंदिरामागे चिंचोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे यांनी देऊळ पोलिसांना दिली आहे. राजू देवरमणी, वय 49 वर्षे, अक्षय देवरमणी, वय 24 वर्षे, शिवराज देवरमणी, वय  58 वर्ष, वैभव नाईक, वय 30 वर्षे, दीपक सौदे, वय 37 वर्षे, सर्व रा. गांधीनगर देहूरोड, तालुका हवेली, जिल्हा पुणे या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुणाल कटारे हे या प्रकरणात सहावा आरोपी आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 364, 307, 143, 144, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Hand Furnace : अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहिम राबवा – मंत्री शंभूराज देसाई

सोमवारी, 19 सप्टेंबरला आशिष देवरमणी याने वेफर्स घेऊन आत्महत्या केली होती. याचा मनात राग धरून मंगळवारी 20 सप्टेंबरला मयत देवरमणीचे नातेवाईक या प्रकरणातील आरोपी रिक्षा मधून फिर्यादीच्या राहत्या घरी आले.(Kidnapping case)त्या ठिकाणी फिर्यादीला फिर्यादीचे भाऊजी तायप्पा यांनी बाहेर बोलाविल्याने फिर्यादी बाहेर आले असता आरोपी राजू देवरांनी याने फिर्यादीच्या गळ्यात हात घालून जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले व त्यानंतर तोही स्वतः रिक्षात बसला. त्यानंतर आरोपी अक्षय देवरमणी, शिवराज देब्रम्हणी दिपक सौदे व कुणाल कटारे हेही त्या रिक्षात बसले.

तेव्हा फिर्यादीचे भाऊजी तायप्पा व फिर्यादीची आई हे त्यांना आडविण्यासाठी आले असता आरोपींनी फिर्यादीची भाउजी व आई यांना ढकलून दिले. आरोपी वैभव नाईक ती रिक्षा चालवीत देहू रोडच्या दिशेने निघाला. रिक्षात बसलेले सर्वजण फिर्यादीला म्हणाले की, तुझ्यामुळे आमचा आशिष गेला तुला जीवंत सोडत नाही तुझा मर्डरच करतो असे म्हणत फिर्यादीला हाताने व लाथा बुक्क्याने मारहाण केली.(Kidnapping case) त्यामुळे फिर्यादी रक्त बंबाळ झाले. आरोपी कुणाल कटारे याने त्याच्या जवळील सुरा काढून फिर्यादीला जीवे मारण्यासाठी मारला परंतु फिर्यादीने तो  चुकवला. त्यानंतर फिर्यादीला सेंट्रल चौक देहूरोड येथे दिशातून रस्त्यावर ढकलून देऊन सोडून निघून गेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.