Bhosari News : क्रिकेट खेळण्यास जाऊ न दिल्याने घर सोडलेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण 

एमपीसी न्यूज – वडिलांनी क्रिकेट खेळण्यास जाऊ न दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाने राहते घर सोडलं. घरातून निघून गेलाला मुलगा परत घरी न आल्याने त्यांच्या घरच्यांनी  मुलाचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. शुक्रवारी (दि. 27) आळंदी रोड परिसरात हि घटना घडली. 

संजय सखाराम मुंढे (वय 38, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाने क्रिकेट खेळण्यास जाऊ नको, अभ्यास कर असे म्हटल्याच्या कारणावरून राहते घर सोडलं. तो घरी परतला नसल्याने त्याचं कुणीतरी अपहरण केल्याची शंका पलकांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.