Pune News : खंडणीसाठी ऑफिस बॉयचे अपहरण प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज : ऑफीस बॉयचे अपहरण करून बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना एक फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अपहरण झालेल्या तरुणाने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

आकाश ऊर्फ गणेश सुग्रीव घोडेस्वार (वय 29), राहुल ऊर्फ डॉन बाळू घोरपडे (वय 22, दोघेही रा. लक्ष्मीनगर, येरवडा,पुणे) आणि जयसिंग मनोहर राठोड (वय 41, रा. हडपसर,पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी साईकुमार शिवमूर्ती जावळकोटी (वय 51, रा. सिंहगड रोड,पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वारजे येथील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे एक तरुण ऑफीस बॉय म्हणून काम करतो. बुधवारी  सकाळी संबंधित तरुण वाराजेमधील शिवगंगा सोसायटी येथून जात होता. त्यावेळी आकाश व त्याच्या साथीदारांनी त्यास रिक्षात बसवून त्याचे अपहरण केले, अशी फिर्याद देण्यात आली आहे. घोडेस्वार याच्यावर विविध पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.