Kilave : प्रज्ञा खानोलकर, मनोज खानोलकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज – नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि माजी नगरसेविक मनोज खानोलकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिध्द निवेदक क्रांती नाना मळेगावकर प्रस्तूत ‘न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम बुधवारी (दि. 25) रोजी किळवे येथील हॉटेल धनश्री ग्राऊंड येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे, असे आयोजकांनी सांगितले आहे.

महिलांना उत्तम प्रकारचे व्यासपीठ मिळावे, यासाठी या न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सहभाग घेऊन महिलांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासात भर घालावी. तसेच याबरोबर आणखी इतर 50 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, असे नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.