Killing of Pregnant Elephant: केरळमधील हत्तिणीच्या निर्घृण हत्येमुळे देशभर संतप्त प्रतिक्रिया

Killing of Pregnant Elephant: Angry reaction across the country over the brutal killing of an elephant in Kerala

एमपीसी न्यूज – भूकेने व्याकूळ झालेल्या गर्भवती हत्तिणीला अननसातून फटाके खायला घालून तिची क्रूर हत्या करण्यात आली. केरळमधील मल्लपूरम ही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. सामान्य नागरिकांपासून ते खेळाडू, कलाकार आणि उद्योगपतींपर्यंत सर्वांना या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

उत्तर केरळमधील मल्लपूरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तिणीला फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिले. हत्तिणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तिणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या पिल्लासह तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्याने ही वेदनादायक घटना सोशल मीडियावर पोस्ट केली. लवकरच ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोक चांगलेच संतापले. शिकारीची ही पद्धत विशेषतः रानडुकरांना पकडण्यासाठी वापरतात.

बचाव पथकातील मोहन कृष्णन यांनी फेसबुकवर लिहिले आहे की, ही हत्तीण अन्नाच्या शोधात जंगलातून जवळच्या गावात पोहोचली होती. इथे ती इकडे-तिकडे भटकत होती. यानंतर काही लोकांनी त्याला फटाके भरलेले अननस दिले. फटाके इतके प्रभावी होते की, त्याचे तोंड आणि जीभ गंभीर भाजली गेली होती. हत्तीण अन्नाच्या शोधात गावोगावी फिरली. दुखण्यामुळे तिला काही खायला जमले नाही. मादी हत्तीने जखमी होऊनही कोणालाही इजा केली नाही, कोणावरही हल्ला केला नाही. ती खूप सरळ आणि शांत होती.

मोहन कृष्णन यांनी पुढे असे लिहिले की, मादी हत्तीच्या पोटात एक पिल्लू होती. ती 18 ते 20 महिन्यांत त्या पिल्लाला जन्म देणार होती. त्या पिल्लाला वाचविण्यासाठी अन्नाच्या शोधात ती वेलियार नदीत पोचली. ती पाण्यात उभी राहिली. तोंडात पाण्यात टाकून तिलाही आराम मिळाला असावा. वन अधिकाऱ्यांना हत्तीची दयनीय परिस्थिती कळताच त्यांनी जखमी हत्तिणीला वेलियार नदीतून बाहेर काढण्यासाठी सुरेंद्रन व निलकांत हे दोन कुमकी हत्ती आणले. तिला बाहेरही काढण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला होता.

मृत हत्तीणीचे शवविच्छेदन अहवालानुसार ती बर्‍याच दिवसांपासून उपाशी होती आणि वेदनांमुळे अन्न आणि पाणी घेऊ शकली नव्हती.  स्फोट झाल्यामुळे हत्तीणीच्या तोंडावर जखमा झाल्या आहेत. 10 ते 12 दिवस खूप वेदना होत होती. या वेदनेमुळे तिला अन्न आणि पाणीही घेता आले नाही, यामुळे ती अशक्त झाली आणि ती पाण्यात पडली आणि बुडू लागली. पोकळीतील जखमा चिघळल्या होत्या. अहवालानुसार, बुडण्यामुळे हत्तीच्या शरीरात भरपूर पाणी होते आणि फुप्फुसांचे काम थांबले आहे.

maharashtra times

हत्तींची हत्या ही भारतीय संस्कृती नाही – प्रकाश जावडेकर

केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींना गजाआड केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. फटाके खायला घालून मारणे ही भारतीय संस्कृती नाही, या शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

 

मनेका गांधी कडाडल्या

केरळमध्ये दरवर्षी जवळपास 600 हत्तींना मारले जाते. म्हणजेच प्रत्येक तिसऱ्या दिवसाला एक हत्ती मारला जातोय. अतिशय क्रूरतेने त्यांची हत्या केली जाते. हत्तींची कडक उन्हात परेड करतात. मग हत्ती पळू लागले की त्यांना मारून टाकतात. तिथे हत्तींच्या नावाने विमा उतरवण्यात येतो. मग हत्तींना गंजलेले खिळे ठोकले जातात. यामुळे गँगरीन होऊन हत्ती मरतात आणि या मेलेल्या हत्तींच्या विम्याचे पैसे मिळवतात. एवढचं नाही तर पायात बेड्या टाकून हत्तींना पाण्यात बुडवून मारले जाते, असा आरोप मनेका गांधी यांनी केला आहे.

वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणाबाबत नेहमीच अग्रेसर आणि आग्रही भूमिका घेणाऱ्या मनेका गांधी यांनी हत्तींच्या हत्येबाबत मोठे वक्तव्य केले आहे.  केरळमधील मलप्पूरम या क्रूर घटनांसाठी कुख्यात आहे. राहुल गांधी हे तेथील खासदार आहेत. त्यांनी कारवाईसाठी प्रयत्न का केले नाहीत? ते गप्प का आहेत, असा सवाल मनेका गांधी यांनी केला आहे.

मलप्पूर हा देशातील असा जिल्हा जिथे रोज काहीना काही कारस्थान होत असतं. तिथे जनावरांना मारलं जातं. फक्त हत्तींनाच मारत नाही. तर हजारो जनावरांना मारण्यासाठी विष कालवलं जातं. यामुळे पक्षी, कुत्रेही मरतात. तिथे रोज मारहाण होते, असं मनेका गांधी म्हणाल्या.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन मल्लपूरममधील घटनांवर कुठलीच कारवाई करत नाही. कारण हे सरकार कारवाई करण्यास घाबरते. केरळमध्ये काहीही मारा. केरळ सरकार कुठलीच कारवाई करत नाही, असे केरळमध्ये म्हटले जाते. वन विभागाच्या सचिव आशा थॉमस, वन्यजीव सुरक्षा अधिकारी सुरेंद्रन आणि पर्यावरण मंत्री के. राजू यांच्याशी अनेकदा संपर्क करून चर्चा केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ही काही पहिली घटना नाही. चार-पाच दिवसांत एखाद्या हत्तीला मारले जाते, असा गंभीर आरोप मनेका गांधी यांनी केला आहे.

मलप्पूरम हे वन्यजीवांच्या हत्येसाठीच कुख्यात नाही तर तिथे माणसांवरही क्रूर अत्याचार केले जातात. मल्लप्पूरमध्ये अनेक महिलांच्या हत्या झाल्या आहेत. हिंदू-मुस्लिम दंगल घडवून अनेकांचे हात कापण्यात आले आहेत. तिथली परिस्थिती अतिशय भयंकर आहे. केरळ सरकार त्यांना घाबरून आहे. म्हणून त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. प्रशासनातील अतिशय कमकुवत कर्मचाऱ्यांना मल्लप्पूरममध्ये पाठवले जाते, असे मनेका गांधी म्हणाल्या.

निर्दोष वन्यप्राण्यांची हत्या संतापजनक – रतन टाटा

गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर उद्योगपती रतन टाटा यांनी संताप व्यक्त केला आहे. निष्पाप आणि गर्भवती हत्तीनीची फटाक्यांनी भरलेले अननस खाऊ घालून हत्या केली. निर्दोष वन्यप्राण्यांची ही हत्या म्हणजे एखाद्या माणसाच्या हत्येपेक्षा कमी नाही. या प्रकरणी न्याय मिळालाच पाहिजे, असं रतन टाटा यांनी म्हटलंय.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.