IPL News : अटीतटीच्या सामन्यात किंग्ज 11 ने केली केकेआर वर केली रोमहर्षक मात

एमपीसी न्यूज : (विवेक  कुलकर्णी) अटीतटीच्या सामन्यात किंग्ज 11 ने केली केकेआर वर केली रोमहर्षक मात केली. मात्र या विजयाने झाला तिसऱ्याचा लाभ झाला आहे. पंजाबच्या विजयाने दिल्ली सुद्धा झाली कॉलिफाय झाली आहे.

दोन्ही संघासाठी विजय महत्वपूर्ण असल्याने दोन्हीही संघ जिवाची बाजी लावतील अशी अपेक्षा असल्याने एक रंगतदार सामन्याची अपेक्षा क्रिकेट रसिकांना होती आणि अगदी तसाच हा सामना झाला सुद्धा. ज्यामध्ये पंजाब किंग्जने केकेआरवर पाच गडी राखून विजय मिळवला. गंम्मत म्हणजे या विजयाने पंजाब पेक्षा जास्त फायदा दिल्ली कॅपिटल्सच झाल्याने दिल्ली संघ हा कॉलिफाय होणारा दुसरा संघ ठरला आहे.

दुबई येथे झालेल्या आयपीएल 2021 च्या आजच्या 45व्या सामन्यात किंग्ज 11 पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, केकेआर कडून शुभमन गील आणि वेंकटेश अय्यरने सलामीला नेहमी प्रमाणे सुरुवात केली असे वाटत असतानाच गील सामन्याच्या तिसऱ्याच षटकात केवळ सात धावा करून अर्शदीपच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला.

तेंव्हा संघाच्या केवळ 18 च धावा झाल्या होत्या.पण या धक्क्याने जराही विचलित न होता वेंकटेश अय्यर आणि राहूल त्रिपाठी या फॉर्मात असलेल्या फलंदाजानी सुंदर खेळत संघाचा डाव सावरला. दोघेही उत्तम खेळत होते. बघताबघता दोघांनी आणखी 72 धावांची भागीदारी सुद्धा नोंदवली.

कोलकाता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे असे वाटत असतानाच राहुल त्रिपाठी रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर 26 चेंडुत 34 धावा काढून बाद झाला.त्याने यात तीन चौकार आणि एक षटकार मारला. तो बाद झाल्यानंतर कर्णधार मॉर्गनने आपल्या आधी नितीश राणाला पाठवून संघहीत पाहिले, कर्णधार मॉर्गन या स्पर्धेत अजून तरी विशेष कामगिरी करू न शकल्याने त्याने राणाला आपल्या आधी पाठवून कौतुकास्पद निर्णय घेतला.

राणा आणि अय्यर दोघेही चांगले खेळत होते, यादरम्यान अय्यरने आपले यास्पर्धेतले दुसरे अर्धशतक सुद्धा पूर्ण केले, त्याने या स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, आजही त्याने भरीव कामगिरी केली.

मात्र अर्धशतक करून तो वैयक्तिक 67 धावांवर बाद झाला, यासाठी त्याने केवळ 49 चेंडू घेतले. त्याला रवी बिष्णोईनेच बाद केले,पाठोपाठ कर्णधार मॉर्गन सुद्धा, त्याला आजही काही खास करता आले नाही मात्र दुसऱ्या बाजूने राणा आक्रमक खेळत होता, त्याने केवळ 18 चेंडूत 31 धावा चोपताना 2 चौकार आणि दोन षटकार मारले.

तो बाद झाल्यानंतर केकेआरच्या मोठया धावसंख्येच्या आशाही बाद झाल्या आणि 20 षटकानंतर केकेआरने सात गड्यांच्या मोबदल्यात 165 धावा काढल्या. किंग्ज 11  पंजाब कडून आजही अर्शदीप सिंगने जबरदस्त गोलंदाजी करत तीन महत्वपूर्ण गडी बाद केले, तर युवा लेगस्पिनर रवी बिष्णोईने दोन.

आत्मघाती खेळासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या किंग्ज 11 पंजाबने 166 धावांचा पाठलाग करताना जबरदस्त सुरुवात केली. के एल राहुल आणि मयंक अगरवालने पहिल्या गड्यासाठी 70 धावांची सलामी देत आश्वासक आणि आक्रमक सुरुवात केली. दोन्ही सलामीवीर आत्मविश्वासाने खेळत होते. चौकार आणि षटकाराची भाषाही बोलत होते, याच नादात मयंक 27 चेंडूत 40 धावा काढून चक्रवर्तीचा शिकार झाला. त्याने तीन चौकार आणि तीन षटकार मारले.

यानंतर आलेल्या पुरनने अगदी थोड्याच वेळात आपली विकेट बहाल करत तो आपल्या गुणवत्तेला न्याय देत नाही या आरोपाला एकप्रकारे पुष्टीच दिली. बाद होण्याआधी त्याला एक जीवदान सुद्धा मिळाले होते पण बाबा याचा फायदा उठवू शकला नाही आणि केवळ 12 धावा करून चक्रवर्तीचा दुसरा बळी ठरला.

मात्र त्यानंतर आलेल्या मारक्रमने कर्णधार राहूलला उत्तम साथ देत खेळ केला, यादोघानी तिसऱ्या गड्यासाठी 45 धावा जोडल्या खऱ्या, पण तो आणि दीपक हुडा थोड्या फार फरकाने बाद झाल्यावर पंजाब पुन्हा एकदा आजही हारणार का असे वाटायला लागलेही  होते,

मात्र कर्णधार राहुलने आपली जबाबदारी ओळखत  आणि इतर खेळाडूंची मानसिकता जाणून शेवटच्या धावेपर्यंत मैदानावर थांबण्याचा केलेला निश्चय यामुळे पंजाब आज तरी आपल्यावर होत असलेल्या आरोपाला खोटे ठरवण्यात यशस्वी होईलले वाटत असतानाच शेवटच्या षटकात राहूल सुध्दा बाद झाला आणि पुन्हा एकदा पंजाब अडचणीत आले असे वाटत असतानाच शाहरुख खानने एक साहसी षटकार मारत संघाला विजयी केले,

खरे तर हा फटका राहूल त्रिपाठीने झेललाही होता पण दुर्दैवाने तो झेल घेतल्यानंतर सीमारेषा ओलांडून बाहेर गेल्याने पंजाब संघ विजयी झाला.पंजाब संघाकडून कर्णधा6  राहुलने सर्वाधिक 67 धावा काढल्या, तर मयंक आणि शाहरुख खानने सुद्धा मोलाचे योगदान दिले.

ज्यामुळे पंजाब किंग्ज संघाने एक रोमहर्षक विजय मिळवला,पंजाबच्या या विजयाने मुंबई संघ एक पायरी खाली घसरला आहे तर दिल्ली कॅपिटल सरळसरळ प्ले ऑफ साठी पात्र झाले आहे. कर्णधार राहुलच्या निग्रही खेळीने त्याला सामनावीरही केले. आणि या स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप ही मिळवत शिखर धवनला मागे टाकले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.