Vadgaon Maval : अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या मावळ तालुकाध्यक्षपदी किरण इंगळे

एमपीसी न्यूज- अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या मावळ तालुकाध्यक्षपदी जांबवडे गावचे किरण वसंत इंगळे यांची नुकतीच निवड करण्यात आली. संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख मंगेश शिरसाट यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेला साहाय्यभूत ठरणाऱ्या आणि ध्येयधोरणे मान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांचे व कलावंतांचे संघटन करून कला, साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक तसेच चित्रपट क्षेत्रातील अत्यंत हुशार व प्रामाणिक मेहनती कलावंतांना या द्वारे सांस्कृतिक व्यासपीठ मिळवून देऊन लोकशाही समाजावर निष्ठा ठेवून भारतीय लोकशाही मजबूत करावी असे या पत्रात म्हटले आहे. संपूर्ण चित्रपट संघटनेचे पदाधिकारी नियुक्त करून त्याबद्दलचा अहवाल संघटनेला सादर करावा असेहे या नियुक्तीपत्रामध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.