Maharashtra Politics : कोल्हापूर जिल्हाबंदीच्या आदेशानंतर किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

एमपीसी न्यूज – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. जिल्हाबंदीच्या या निर्णयावर मात्र सोमय्या यांनी उत्तर देत ‘ठाकरे सरकारच्या दडपशाहीला आपण घाबरत नाही’ असे म्हटले आहे

किराट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला असून याच पार्श्वभूमीवर पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते, मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं कायदा सुव्यवस्थेचं कारण देत सोमय्या यांना जिल्हाबंदी केली.

या नाट्यमय घडामोडीनंतर आता पोलिसांनी सोमय्या यांना कराडमध्येच उतरवले आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी  कराडमधील शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले आणि ठाकरे सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. सरकारवर टीका करत मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

भाजप नेते किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले ?

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.