Hadpsar : किर्लोस्कर न्युमेटिक कंपनीच्या बडतर्फ कामगारांना न्याय मिळवून देणार

खासदार आढळराव पाटील यांनी दिली उपोषणस्थळी भेट

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हडपसर येथील किर्लोस्कर न्युमेटिक कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या कामगारांच्या उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेतली.

किर्लोस्कर न्युमेटिक कंपनीने अचानकपणे 131 कामगारांना बडतर्फ केल्यानंतर हे सर्व कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले आहेत. कंपनीने युनियन समवेत चर्चा करावी अशी कामगारांची मागणी असून व्यवस्थापनाने मात्र ताठर भूमिका घेऊन कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर कामगार आयुक्त कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीलाही कंपनीने प्रतिसाद न दिल्याने कामगारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर खासदार आढळराव पाटील यांनी आज उपोषणाला बसलेल्या कामगाराची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष आभिजीत अडागळे, सेक्रेटरी सचिन सुरवसे आणि कर्मचारी वर्ग, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देशमुख, माजी नगरसेवक  तानाजी लोणकर, जिल्हा उपप्रमुख अमोल हरपळे, उपशहरप्रमुख समीर आण्णा तुपे राजेंद्र बाबर, संदीप मोरे हडपसर युवासेना विधानसभा समन्वयक तुषार गोडसे आदी उपस्थित होते.

यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना खासदार आढळराव पाटील म्हणाले की, मी स्वत: जातीने कंपनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करणार आहे. तसेच कामगार उपायुक्तांनी दि. 30 ऑगस्ट रोजी बोलावलेल्या बैठकीला माझ्यावतीने प्रतिनिधी उपस्थित राहून कामगारांची बाजू मांडणार असल्याचेही खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.

यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष आभिजीत अडागळे, सेक्रेटरी सचिन सुरवसे आणि कर्मचारी वर्ग, शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देशमुख, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, जिल्हा उपप्रमुख अमोल हरपळे,उपशहरप्रमुख समीर अण्णा तुपे, राजेंद्र बाबर, संदीप मोरे हडपसर युवासेना विधानसभा समन्वयक तुषार गोडसे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.