Nigdi News : निगडी प्राधिकरणात 8 डिसेंबरपासून किर्तन महोत्सव

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका माजी नगरसेविका शर्मिला बाबर, भारतीय जनता पार्टी निगडी प्राधिकरण व श्रीराम सेवा मंडळ, राम मंदिर (Nigdi News) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

निगडी प्राधिकरणातील श्री राम मंदिर, सेक्टर 27 येथे दररोज सायंकाळी सहा वाजता किर्तन होणार आहे. यामध्ये 8 डिसेंबर रोजी ह.भ.प. विश्वासबुवा कुलकर्णी, 9 डिसेंबर रोजी ह.भ.प. श्रेयस बुवा बडवे,10 डिसेंबर रोजी हभप. अंबिकाताई टोळे, 11 डिसेंबर रोजी ह.भ.प. संदीपबुवा मांडके यांचे किर्तन आणि 12 डिसेंबर रोजी हभप. चारुदत्तबुवा आफळे यांच्या किर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

Pune News: बॅडमिंटनचे फुल काढत असतांना विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने 10 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

या किर्तन महोत्सवासाठी प्राधिकरण परिसर व शहरातील जास्तीत जास्त (Nigdi News) नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक माजी नगरसेविका शर्मिला बाबर व सामाजिक कार्यकर्ते राजेद्र बाबर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.