Maval News : साळुंब्रे गावातील इंदुरीकर महाराजांचे कीर्तन रद्द

एमपीसी न्यूज – कै. राजाराम बळवंत राक्षे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कीर्तनरुपी सेवा आयोजित केली होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने तसेच शासनाने घातलेल्या जमावबंदीच्या नियमांमुळे हा कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले मावळ तालुकाध्यक्ष कै राजाराम राक्षे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस, भैरवनाथ ट्रस्ट साळुंब्रेचे अध्यक्ष निलेश राक्षे यांनी इंदुरीकर महाराजांची कीर्तन सेवा आयोजित केली होती. हा कार्यक्रम रद्द झाल्याने क्षेत्र पंढरपूर येथील श्री घोरावडेश्वर दिंडी धर्मशाळेसाठी 01 लाख 01 हजार 01 रुपये व क्षेत्र आळंदी येथील पार्थराज गुरुकुलसाठी 10 हजार 01 रुपये देणगी देऊन हा कार्यक्रम देणगी स्वरुपात साजरा केला.

दरम्यान निलेश राक्षे यांनी पुण्यस्मरण कार्यक्रम घरगुती साध्या पद्धतीने साजरा केला. याप्रसंगी घोरावडेश्वर दिंडीचे अध्यक्ष हभप मुकुंद (नाना) राऊत, उपाध्यक्ष हभप बारकु गराडे,हभप संजय बोडके, कार्याध्यक्ष हभप संतोष शेलार, आळंदीचे हभप संतोष महाराज राऊत, भगवान गडचे गोरक्षनाथ महाराज दौंड, माजी सरपंच धनंजय विधाटे, माजी सदस्य धनंजय (नाना) राक्षे, साळुंब्रे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन मोतीराम राक्षे,हभप विठ्ठल शेळके,  माणिक कडेकर,अरूण राक्षे, हभप संतोष किसन राक्षे, संतोष सहादु राक्षे, म्हंपत काका कुलकर्णी, राष्ट्रवादीचे युवा संघटक श्रीनिवास राक्षे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत मोतीराम राक्षे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल वारकरी पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गुलाबराव राक्षे यांनी केले. तर आभार निलेश राक्षे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.