Kisan Morcha : शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठींबा, संयुक्त मोर्चाला शरद पवार करणार संबोधित

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय किसान सभेच्या विराट मोर्चा 26 जानेवारीला राजभवनावर धडकणार आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाली असून त्यांनी मुंबईकडे कूच केली आहे. या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. स्वतः शरद पवार उद्या या संयुक्त मोर्चोला मुंबईत संबोधित करणार आहेत.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा या झेंड्याखाली राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, कामगार मुंबईतील आझाद मैदान येथे जमायला सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि.25) जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या मोर्चाला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार आहे.

मुंबईमध्ये आलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिक ते मुंबई वाहन मार्चला सुरुवात करण्यात आली आहे. हा मोर्चा आता भिवंडीत दाखल झाला आहे. दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाचे आता सर्वत्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.