Kiwale News : विकासनगरमधील अन्नछत्राने भागविली तब्बल 8 हजार नागरिकांची भूक

युवा सेनेचे राजेंद्र तरस यांचा सेवाभावी उपक्रम

एमपीसीन्यूज : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गरजू व गोरगरीब नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड शहर युवासेना आणि राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने विकासनगर-किवळे येथे गेल्या 21 दिवसांपासून मोफत अन्नदान करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 8189 गोरगरीब व फिरस्त्या नागरिकांना अन्नदान करण्यात आले.  आज अक्षय तृतीया व रमझान ईदनिमित्त मसाला भात व स्पेशल आंबा रसाचे वाटप करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहर युवा सेनेचे राजेंद्र तरस यांच्या पुढाकारातून हा सेवाभावी उपक्रम सुरु करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते धीरज बाबर, विनोद बनसोडे, मॉन्टी बर्फे, शुभम तरस, राहुल सवाई, योगेश गेडाम, संतोष चौरे, मंगेश निंबाळकर, गणेश जुनवने, शैलेश गायकवाड,  दीपक गवारे, राधाकृष्ण पिल्ले, आदित्य भांगरे, झियाउद्दीन शिपाही, कुमठेकर काका, लकी लांबा आदींनी अन्नदानासाठी परिश्रम घेतले.

सध्या पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे संकट गडद झाले आहे. त्यात ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्यासह शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेले व रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अशा संकट काळात या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून युवा सेनेचे नेते राजेंद्र तरस यांनी विकासनगर-किवळे येथे मोफत अन्नछत्र सुरु केले.

मुस्लिम बांधवांना इफ्तारसाठी फळ वाटप

गेल्या 21  दिवसांत या अन्नछत्राच्या माध्यमातून 8189 गोरगरीब व फिरस्त्या नागरिकांना अन्नदान करण्यात आले. यंदा लॉकडाऊन कालावधीत मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु झाला. या कालावधीत मुस्लिमांचे रोजे सुरु होते. त्यामुळे रमजान ईदपूर्वी सलग तीन दिवस विकासनगर परिसरातील मुस्लिम बांधवांना इफ्तारसाठी फळ वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.