Kivale News : राजेंद्र तरस फाउंडेशनतर्फे 812 गणेश मूर्तींचे संकलन आणि विसर्जन

विकासनगर येथील श्री राजेंद्र बाळासाहेब तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने गणेश विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला.

एमपीसी न्यूज : विकासनगर येथील श्री राजेंद्र बाळासाहेब तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने गणेश विसर्जन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला किवळे आणि विकासनगर परिसरातून उदंड प्रतिसाद मिळाला. उत्सव कालावधीत एकूण 812 गणेश मूर्ती संकलित करून त्यांचे विसर्जन करण्यात आले.

यंदा या कोरोनाच्या संकट काळात सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने नदी घाटावर गणेश विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे, प्रशासनावरील ताण कमी व्हावा, याकरिता फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांनी विसर्जन आपल्या दारी ही मोहीम हाती घेतली.

या मोहिमेत दीड दिवसांच्या गणपतीपासून अनंत चतुर्थीपर्यंत एकूण 812 गणेश मूर्ती संकलित करून त्यांचे विसर्जन करण्यात आले. किवळे-मुकाई चौक आणि विकासनगर परिसरातील गणेश भक्तांकडून या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे राजेंद्र तरस यांनी सांगितले.

यांच्यासह सदस्य गणेश जुनवणे, माँटी बर्फे, सागर पाठक, सागर लोखंडे, राहुल सवाई, सोमनाथ साळुंखे, प्रकाश जाधव, विनोद लोंढे, कुमार माने, रामू सुतार, विनोद येंबुलर, अनिल आल्हाट, सुनीलकुमार सहा, पप्पू गोरडे आदींनी मूर्ती संकलन विसर्जनासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.