Kivale News : विकासनगर येथे 157 महिलांना मोफत चष्मे वाटप

एमपीसीन्यूज : श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विकासनगर येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 157 महिलांची नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. तर 54 नागरिकांचे मोतीबिंदूचे निदान झाले.

डॉ. सुनील वानखेडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हे शिबीर पार पडले. हडपसर येथिल एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने नेत्र तपासणी केली.

_MPC_DIR_MPU_II

शिबिराचे मुख्य आयोजक राजेंद्र तरस , शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, शहरप्रमुख भरत नायडू, नगरसेविका संगीता भोंडवे , देहूरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, सहायक पोलीस निरीक्षक रामेकर, शिवसेना देहूरोड शहर सल्लागार देवा कांबळे, किवळे रावेत सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब तरस, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी वानखेडे, सावळेराम वानखेडे, सिंधू तंतरपाळे, प्रमिला तंतरपाळे, सुनीता चंदने पाटील आदी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्याहस्ते महापालिका आरोग्य विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांना मोफत मास्क व चष्मे वाटप करण्यात आले. श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन व राजेंद्र तरस स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.