Kiwale : फुकट कपड्यांची मागणी करत कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्ती कपडे व रोख रक्कम घेतली हिसकावून

एमपीसी न्यूज –  फुकट कपड्यांची मागणी केल्यानंतर दुकानदाराने( Kiwale) त्याला नकार दिला असता दोन आरोपींनी दुकानात हातात कोयता घेऊन गोंधळ घातला.तसेच दुकानातून कपडे व हजार रुपायांचा हप्ता जबरदस्ती काढून घेतला.हा प्रकार गुरुवारी (दि.25) सायंकाळी किवळे येथील वाडी मेन्स वेअर येथे घडला.

याप्रकरणी रोहन राजेश देशमुख (वय 22 रा. किवळे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रफिक शेख व राकेश तेलगू यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune : संगमवाडी पुलावर शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी फोन केला व फुकट कपड्यांची मागणी केली . यावेळी फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. यावेळी आरोपी दुकानावर आले व त्यांनी हाताने फिर्यादीला मारहाण केली व  हातातील कोयत्याने दहशत पसरवली. तसेच फिर्यादीच्या दुकानातून दोन जिन्स पॅन्ट व तीन शर्ट तसेच हप्ता म्हणून हजार रुपये हप्ता  ( Kiwale) घेऊन गेले. यावरून देहुरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.